‘सगळं उलथून टाकलं पाहिजे’ : जगण्याचा आलेख मांडून वर्तमानाला निरुत्तर करणारी कविता
या संग्रहातील सर्वच कविता सरळ सोप्या आहेत. या कविता संभ्रम ठेवत नाहीत. त्या सरळ सरळ काळजाला हात घालतात. विसंगतीची पाळेमुळे खोदून काढण्याचा प्रयत्न करतात. या कविता नुसतं दु:ख मांडत नाहीत, तर त्यावरील उपायही सुचवत राहतात. परिवर्तनवादी विचाराच्या मुळाला हात घालत त्यासारखं चिंतन करायला लावतात. या संग्रहात समाविष्ट कविता एकूणच या सर्व परिस्थितीवर एल्गार पुकारणाऱ्या आहेत.......